Accident… दुचाकी अपघातात तरुण लाईनमनचा मृत्यू ; धारुर शहरात हळहळ.

किल्लेधारुर दि.6 जानेवारी – accident धारुर येथील महावितरण कार्यालयात लाईनमन म्हणून कार्यरत असलेले महेश चंद्रकांत गिरी (वय 30) यांचा धारुरहून अंबाजोगाईकडे जात असताना दुचाकी अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे धारुर शहरात दुःख व्यक्त केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश चंद्रकांत गिरी हे गेल्या काही वर्षांपासून धारुर Dharur येथील महावितरण कार्यालयात लाईनमन म्हणून कार्यरत होते. केज तालुक्यातील बन्सारोळा येथील ते मुळ रहिवासी असुन सध्या अंबाजोगाई येथे निवासी होते. दररोज आपल्या दुचाकीवरुन धारुर Dharur ते अंबाजोगाई असा प्रवास करताना दि.5 शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्याबरोबर दुर्दैवी अपघात accident घडला. केंद्रेवाडी नजीक दुचाकीवरुन पडून ते गंभीर जखमी झाले. अंबाजोगाई येथे प्रथमोपचार करुन लातूरला नेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. महेश गिरी हे अत्यंत मनमिळावू व कर्तव्यदक्ष कर्मचारी होते. लोकांमध्ये मिसळून राहणारे व सहकार्य करणारे कर्मचारी असल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर बन्सारोळा या त्यांच्या मुळगावी आज दि.6 शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.