धारुर शहरात युवकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट.

किल्लेधारूर दि.28 जानेवारी – येथील युवक सत्पाल आश्रुबा मुंडे (वय 24) याने राहत्या घरी आज सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली असून घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले आहेत.
(Youth commits suicide in Dharur city; The reason is unclear.)
धारुर (Dharur) शहरातील गायकवाड गल्ली येथील रहिवाशी सत्पाल आश्रुबा मुंडे याने आज दि.28 शुक्रवारी राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सांयकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी गर्दी केली.
सत्पाल मुंडे याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मुंडे याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. युवकाचे वडील ऊसतोडणीसाठी स्थलांतरीत असल्याचे कळते. तर युवकाने रागाच्या भरात आत्महत्या केल्याची चर्चा होती.
पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन शव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. घटनास्थळी पोलिस निरिक्षक (Police Inspector) नितिन पाटिल जातीने उपस्थित झाले होते.