रानडुक्कराच्या हल्ल्यात युवक जखमी

किल्लेधारुर दि.१६(वार्ताहर) धारुर Dharur तालुक्यातील फकीरजवळा येथील २२ वर्षीय शेतकरी युवक रानडुक्कराच्या Boar हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.१६ सकाळी घडली. हल्ल्यातील युवकावर परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राजेश तुळशीराम घोरपडे हल्ल्यातील जखमी तरुणाचे नाव असुन सोमवारी सकाळी शेतात कापुस cotton वेचणीसाठी तो गेला होता. कापसात cotton लपुन बसलेल्या रानडुक्कराने Boar अचानक हल्ला केला व राजेश ला गंभीर जखमी केलं. भयभीत अवस्थेत पळ काढल्याने जखमी तरुणाचा जिव बचावला. सध्या कापूस cotton वेचणी चे दिवस चालु असल्याने या घटनेमुळे परिसरातील महिला बालके, गावकरी भयभीत होत आहेत. तरी प्रशासनाने त्वरित वन्यप्राणी याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी धारुर Dharur तालुक्यातील फकीर जवळा गावकरी करत आहेत.