युवकाची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी केला भावाला फोन.

बार्शी दि.25 जुलै – भावाला फोन करुन माझ्या पोटात दुखत आहे, मी दारू पिलो आहे, तरी मला न्यायला ये, असे सांगून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना बार्शीत घडली. महेश प्रकाश शिंदे (वय 32) रा. तळेवाडी, सुभाष नगर असे मयत युवकाचे नाव आहे.
(Youth suicide; Called brother before committing suicide.)
महेश शिंदे याचे बार्शीत कपड्याचे दुकान व गॅरेज (Garage) आहे. ही दुकाने भाऊ अशोक आणि महेश चालवतात. आत्महत्या करण्यापुर्वी अशोकला महेशने फोन करून बोलावले. थोड्या वेळाने अशोक महेशला आणण्यासाठी गेला व जवळच्याच कॅन्सर हॉस्पिटलच्या (Cancer Hospital) आसपास इकडे तिकडे पाहिले. मात्र त्याचा शोध लागला नाही.
यानंतर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांकडेही माझा भाऊ दिसला का अशी अशोकने रस्त्यावर विचारणा केली. तास दोन तास इकडे तिकडे त्याचा शोध घेत असताना कॅन्सर हॉस्पिटलच्या (Cancer Hospital) मागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने महेशने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे निदर्शनास आले. भाऊ अशोक शिंदे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन पोलिसांत (Police) आकस्मात नोंद करण्यात आली.