कारवर झाड पडल्याने तीन शिक्षकांचा मृत्यू; दुसऱ्या अपघातात 3 तरुण जागीच ठार.

नाशिक दि.22 जुलै – काल ईदचा दिवस नाशिककरांसाठी अपघात (Accident) वार ठरला. दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जण ठार झाले असून यात तीन शिक्षकांचा समावेश आहे. वरखेड फाट्यावर रस्त्यावरील झाड गाडीवर पडल्याने झालेल्या अपघातात तीन शिक्षकांचा तर ताबा सुटलेल्या ट्रकने चारचाकीस धडक दिल्याने तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना बुधवारी घडल्या. दोन्ही घटनांत इतर चार जण जखमी आहेत.

(Three teachers killed when car falls on car; In another accident, 3 youths were killed on the spot.)

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) दिंडोरीमध्ये (Dindori) एका विचित्र अपघातात (Road Accident) तिघांचा मृत्यू (Three dead) झाला आहे. जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच असल्याचं चित्र असून पावसाळ्यात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालल्याचं दिसून येत आहे. दिंडोरीमध्ये इर्टिका गाडीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

कारवर कोसळले झाड.
दिंडोरी जिल्ह्यात वलखेड फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका आर्टिगा कारमधून पाच जण प्रवास करत होते. त्यांची गाडी वलखेड फाट्याजवळ आली असताना रस्त्यातील झाड खाली कोसळलं. त्याचवेळी त्यांची गाडी त्या झाडाखालून पुढे जात होती. हे झाड नेमकं त्या गाडीवर कोसळल्यामुळे गाडीतील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

तीन शिक्षकांचा मृत्यू
या कारमधून तीन शिक्षक प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. दत्तात्रय बच्छाव, किशोर सूर्यवंशी आणि नितीन तायडे या शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाला. हे तिघंही सुरगाणा तालुक्यातील अलंगून शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही कळायच्या आतच या तिघांना आपले प्राण गमावावे लागले.

ऐन ईदच्या दिवशीच काळाचा घाला.
मुंबई आग्रा महामार्गावरून (Highway) नाशिककडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर नाशिककडून येणारा ट्रक डिव्हाईडर तोडून जोरदार धडकला. अचानक झालेल्या ह्या अपघातात चारचाकी वाहनातील 3 जण जागीच ठार झाले. तर आणखी 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 21) सायंकाळी 7 च्या दरम्यान घडली.
रिजवान इकबाल कुरेशी (वय 30), जुबेर इकबाल शेख (वय 30), हुजेफ एजाज उस्माणी (वय 21), सोहेल अकिल पठाण (वय 22) अशी अपघातात मयत झालेल्यांनी नावे आहे. ही तरुण मुले ऐन ईदच्या सनादिवशीच काळाने हिरावून घेतल्याने कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

रस्ते सुरक्षेचा प्रश्न
रस्त्यावर वाहनचालकांच्या चुकांमुळे होणारे अपघात वाढत चालले असता, अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या देखील वाढत आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे या तीन शिक्षकांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तीन तरुणांना कारण नसताना जीव गमवावा लागला आहे. यामुळे पावसाळ्यात बाहेर पडताना खबरदारी घ्यावी आणि जोरदार वारे किंवा पाऊस पडत असेल, तर सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन पाऊस थांबल्यानंतरच पुढचा प्रवास सुरू करावा, असं आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!