बीड जिल्ह्याला आज दिलासा; धारुर 8 तर केजमध्ये 11, अंबाजोगाई, माजलगाव व पाटोद्यात वाढ …

बीड दि.23 मार्च- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्ण संख्या आज दुसऱ्या दिवशीही उतरत असल्याचे दिसुन आले. दोन दिवसांपुर्वी साडेतीनशे ही विक्रमी संख्या आल्याने चिंता वाढली होती. काल 239 वर संख्या आली होती. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1946 प्राप्त अहवाला पैकी 207 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1739 जण निगेटिव्ह आली आहेत. आज अठराव्या दिवशी बीड तालुक्यात 42 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत.

बीड तालुक्यात अठरा दिवसात आजची संख्या बीडकरांना दिलासा देणारी आहे. केज 11 तर धारुरमध्ये आज 8 कोरोना बाधित आढळली आहेत. काल अंबाजोगाईत 43 असलेली संख्या आज 56 वर तर माजलगावात 25 वर गेली आहे. पाटोदाची संख्या 2 वरुन 12 वर पोहोचली आहे.
(Relief to Beed district today; 8 in Dharur and 11 in Kaij, increase in Ambajogai, Majalgaon and Patoda …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-42, अंबाजोगाई-56, आष्टी-17, धारुर-8, गेवराई-9, केज-11, माजलगाव-25, परळी-15, पाटोदा-12, शिरुर-8, वडवणी-4
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.23 मंगळवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 239 वरुन 207 वर आली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज सलग दुसऱ्या दिवशी दिलासादायक चित्र दिसत आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यात दिवसभरात 24 हजारावर नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. महाराष्ट्रातही सोमवारची संख्या उतरती दिसल्याने दिलासादायक चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!