घात अपघात

भीषण अपघाताने मराठवाडा हळहळला… वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या अपघातात नवरीसह आठ जणांचा मृत्यू.

नांदेड दि.21 फेब्रुवारी – नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भोकर ते हिमायतनगर रस्त्यावर भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या भीषण अपघातात नवरीसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मराठवाडा (Marathwada) हळहळला आहे.

( Marathwada was shaken by a terrible accident … Eight people, including Navri, died in a tempo accident. )

ही घटना आज सोमवारी (दि.21) सायंकाळी सात वाजता घडला. उमरी येथील लग्नाचे वऱ्हाड हे हिमायतनगरहून मुंबई कडे जात असताना भोकर तालुक्यातील सोमठाणा ते राजवाडी पाटी दरम्यान हरिभाऊ ढाब्याजवळ ओव्हरटेक करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

यामध्ये प्रवासी वाहन आणि टेम्पोच्या भीषण अपघातात प्रवासी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ज्यामध्ये नवरीसह आठ जणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वऱ्हाडी हे धर्माबाद तालुक्यातील जारीकोट या गावातील आहे.

धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील युवतीचा विवाह तीन दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यातील साखरा येथील युवकासोबत झाला होता. परतणीचा कार्यक्रम आटोपून नातेवाईकांसह महिंद्रा मॅक्झिमो मिनी व्हॅनमधून (एम.एच.19 एआर 3219) परतत असताना समोरून येणार्‍या ट्रकची (एम.एच.04 एएल 9955) व्हॅनला धडक बसली.

ही धडक एवढी जबरदस्त होती की घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडल्यासारखे चित्र होते. मरण पावलेल्यांचे हात पाय तुटून पडले होते. या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली गेल्याने जेसीबी (JCB) मशीनच्या सहाय्याने वाहनांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी स्थानिक रहिवासी व पोलिस (Police) दाखल झाले आहेत.

कालच एका छोट्या पुलावरुन कार नदीत पडल्याची दुर्घटना राजस्थान मधील कोटा येथे रात्री घडली होती. यात लग्न समारंभानंतर घरी जाणारी नऊ वऱ्हाडीसह नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना घडून चोविस तास उलटत नाही तोच महाराष्ट्रात हा भीषण अपघात झाला. या अपघातात नवरीला जीव गमवावा लागला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!