अल्पवयीन मुलीची रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा नोंद.

अंबाजोगाई दि.13 मे – बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.10) अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली होती. सदरील मुलीने गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी नंतर त्या रोडरोमिओवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात अलिकडे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहेत. त्यातल्या त्यात शैक्षणिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या अंबाजोगाई शहर व तालुक्यातही काही गंभीर गुन्हे घडल्याचे दिसत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील दिपाली रमेश लव्हारे (वय 17) या मुलीने आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली. तिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. दिपालीचे वडील राज्य परिवहन महामंडळात चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत.

दिपालीची आई सुमित्रा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण मागील काही दिवसापासून दिपाली कॉम्प्युटर क्लासला जात येत असताना तिला छेडत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, सतत इशारे करणे अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता. याबाबतची माहिती मयत दिपालीने आईला सांगितली होती. शुक्रवारी (6 मे) रोजी दिपालीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेऊन समज देत दिपालीला त्रास न देण्याबद्दल बजावले होते.

परंतू मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या समजेनंतरही आरोपीच्या वागण्यात फरक पडला नाही. आरोपीचे दिपालीला त्रास देणे सुरुच असल्याचे स्वतः दिपालीने आईला सांगितले होते. त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढूत अशी आईने तिची समजूत घातली. परंतू अखेर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या दिपालीने मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले.

आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेलेली असताना दिपालीने घराच्या माळवदाच्या आडुला साडीने गळफास घेतला. रात्री 11 वाजताच्या सुमारास आई घरी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांच्या मदतीने नातेवाईकांनी दिपालीला स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. दिपालीच्या आईच्या फिर्यादीवरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम 305 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी फरार असून बर्दापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

( Minor girl commits suicide due to Rodrमिguez harassment; Crime record after mother’s complaint. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!