धक्कादायक … त्या 9 जणांची आत्महत्या नसून हत्या ; दोन मांत्रिकांना अटक.

बीड24 ब्रेकींग सांगली दि.28 जुन – महाराष्ट्राला हादरुन सोडणाऱ्या सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटूंबातील 9 जणांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून ती आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावी राहत असलेल्या डॉक्टर माणिक यल्लाप्पा वनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना दि.20 जुन रोजी उघडकीस आली होती. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली होती. कर्जबाजारीपणामुळे सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला होता.
वनमारे कुटूंबातील पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 28), अर्चना पोपट वनमोरे (वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28),माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वनमोरे (वय 15), अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि आक्काताई वनमोरे (वय 72) अशा एकाच कुटूंबातील नऊ जणांचा मृतात समावेश होता.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ प्रकरणी सांगली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. 9 जणांच्या कुटुंबाची ती आत्महत्या नसून ते हत्याकांड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 जणांना विष घालून मारल्याचे पोलीस (Police) तपासामध्ये निष्पन्न झाले असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्तधनाच्या प्रकारातून हे हत्याकांड केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी मांत्रिक धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट आणि अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर सोलापूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. वनमोरे कुटुंबीयांच्या कडून एक चिठ्ठी मिळाली होती ज्यामध्ये काही लोकांची नाव घालून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे ही सामुहिक आत्महत्या सावकारी जाचातून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 25 जणांच्या विरोधात सावकारकीचे गुन्हे दाखल करत 18 जणांना अटक केली होती.
मात्र वनमोरे आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झाले होते, नक्की आत्महत्याच ( Suicide ) आहे, की घातपात, त्याबद्दल हि प्रश्न निर्माण झाला होता. पण पोलिसांच्या तपासामध्ये ती आत्महत्या नसून 9 जणांचा खून (Murder) झाल्याचं निष्पन्न झाले आहे. त्याच बरोबर गुप्तधनाच्या प्रकारातून मांत्रिकांच्याद्वारे हा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलीस अधीक्षक ( Superintendent of Police ) दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सांगली पोलिस करत आहेत.
( Shocking … the murder of those 9 people, not suicide; Two witches arrested. )