माझं गाव

दुर्दैवी … तरुण मुलाच्या आत्महत्येनंतर पित्याने उचलले टोकाचे पाऊल ; धारुर तालुक्यातील घटना.

50 / 100 SEO Score

किल्लेधारूर दि.15 जुलै – तरुण मुलाच्या आत्महत्येनंतर पित्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना धारुर तालुक्यातील आसोला येथे घडली. मोहन पंढरी चोले (वय 50) असे मयताचे नाव आहे.

धारुरच्या बस स्थानक परिसरात श्रीकृष्ण मोहन चोले (वय 27 वर्षे) या युवकाने आठ दिवसांपुर्वीच शुक्रवारी (दि.8) विष (poison) घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरासह आसोला गावात एकच खळबळ उडाली होती. सदर युवकाने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असताना मयत तरुणाच्या वडिलांनी रात्री कोळपिंपरी शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे.

तरुणाने धारुर (Dharur) बस स्थानक परिसरात विषारी औषध घेवून आत्महत्या (Suicide) केली त्यावेळी तरुणाचे पिता मोहन पंढरी चोले (वय 50) हे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला गेलेले होते. घटनेची माहिती कळताच ते परतले होते. मुलाच्या आत्महत्येच्या घटनेला आठ दिवस होत नाही तोच मोहन चोले यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे आसोला गावात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झालेले आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून गावात उलटसुलट चर्चा होत आहे.

( Unfortunate … extreme step taken by father after suicide of young son; Incidents in Dharur Taluka. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!