चौथ्या दिवशी बिबट्याचे दर्शन… सोलेवाडीत बिबट्याने मारली शेतकर्यावर झडप

आष्टी दि.३(प्रतिनिधी) आष्टी (Ashti) तालुक्यातील सोलेवाडी येथे साडे अकराच्या दरम्यान ज्वारीला पाणी घालत असताना आज चार दिवसानंतर अचानक बिबट्याने (Leopard) झडप मारून विकास झगडे (60) या शेतकऱ्यावर हल्ला करून उजव्या पायाच्या मांडीवर व करंगळीला किरकोळ दुखापत केली. घटनास्थळी वनविभागाचे (Forest department) अधिकारी पथक बिबट्याला (Leopard) पकडण्यासाठी रवाना झाले आहेत.
आष्टी (Ashti) तालुक्यातील सोलेवाडीमध्ये शेतकरी आपल्या शेतात ज्वारीला पाणी घालत असताना अचानक बिबट्याने (Leopard) झडप मारून हल्ला केला. पण त्याच्या गळ्यात मफ्फलर व हातात कोयता व बैलाचे घागडमाळ असल्याने स्वसरक्षणार्थ व सावधगिरी बाळगल्यामुळे बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात ते बचावले असून त्यांना आष्टी (Ashti)ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. याबाबत डॉ.रूपाली बांगर यांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सागितले. वनविभागाच्या वतीने शेतकरी व नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाट यांनी केले आहे. दरम्यान चार दिवस अज्ञातवासात असलेल्या बिबट्याने (Leopard) आष्टी (Ashti) तालुक्यातील सोलेवाडी येथे दर्शन दिले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागासह ग्रामस्थांनी परिसरात वेढा घातला आहे.