धारूरधील बेपत्ता तरुणाचे प्रेत शेततळ्यात आढळले…. आत्महत्येचा अंदाज

किल्लेधारूर दि.११(प्रतिनिधी) शहरातील रहिवाशी व काल पासून बेपत्ता असलेल्या संतोष विश्वनाथ शिनगारे (३५) या तरुणाचे प्रेत शहरालगतच्या शेततळ्यात आज दुपारी आढळून आले. भोळसर असलेल्या या तरुणाने वेडाच्याभरात आत्महत्या (Suicide) केल्याचा अंदाज पोलिसांनी (Police) वर्तविला आहे.
अधिक माहिती अशी की शहरातील कसबा विभागातील रहिवाशी संतोष विश्वनाथ शिनगारे (३५) हा भोळसर तरुण काल पासून बेपत्ता होता. याबाबत कुटूंबियांनी धारुर पोलिस (Police) ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. आज दि.११ सोमवार रोजी दुपारी शहराजवळच्या योगिराज नरहरी शिनगारे यांच्या शेततळ्यात प्रेत आढळून आले. याबाबत शहानिशा केल्यानंतर सदरील प्रेत हे बेपत्ता तरुणाचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिस उपनिरिक्षक पी.डी. डोलारे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबत धारुर पोलिसात (Police) आकस्मातची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरील तरुणाने वेडाच्याभरात आत्महत्या (Suicide) केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.