ज्येष्ठ नागरीकांसाठी खुषखबर…. किल्लेधारूर मधूनही एसटीची विशेष देवदर्शन मोहीम

किल्लेधारूर दि.११(प्रतिनिधी) किल्लेधारूर एसटी आगाराकडून किल्लेधारूर येथून दि. १५ फेब्रुवारी सोमवार पासून विशेष देवदर्शन एसटी (ST) बसने दोन दिवसांची प्रवास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण तिकिटासाठी नागरिकांसाठी ७७० रुपये व अर्ध्या तिकीटाची किंमत ज्येष्ठ नागरिकांसाठी
senior citizens
केवळ ३८५ रुपये असेल. धारूर तालुक्यातील नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक शंकर स्वामी यांनी केले आहे.
किल्ले धारूर आगारा मार्फत दोन दिवसीय देवदर्शन एसटी (ST) बस (Bus) द्वारे होणार आहे. दिनांक १५ फेब्रुवारी सोमवारी सकाळी बस (Bus) स्थानक किल्लेधारुर येथे सकाळी- ८:०० जाणार, कळंब-९:००, येरमाळा- १०:०० येथे येडेश्वरी देवीचे दर्शन, बार्शी -१२.००, कुर्डूवाडी-१२:४५, पंढरपूर- १४:०० याठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन, अक्कलकोट-१९:३० श्री स्वामी समर्थ दर्शन व मुक्काम, दुसऱ्या दिवशी अक्कलकोट येथून सकाळी ७:०० वाजता निघणार सोलापूर- ८:३०, तुळजापूर-११:०० वाजता तुळजाभवानी देवीचे दर्शन, लातूर -१३:००, आंबेजोगाई-१५:०० योगेश्वरी देवीचे दर्शन, परळी-१७:०० परळी वैजनाथ दर्शन, तेथून परत धारूर या ठिकाणी येणार. तरी नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आव्हान आगार व्यवस्थापक शंकर स्वामी यांनी केले आहे.