सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारूर दि.20 मे – धारूर (Dharur) तालुक्यातील फकीर जवळा येथील एका विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून मंगळवार दिनांक 18 रोजी विष प्राशन केले होते, सदर विवाहितेस अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता मंगळवारी रात्री तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्या प्रकरणी पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Married woman commits suicide after being harassed by her father-in-law; Incidents in Dharur taluka.)
अनिता बालासाहेब मोरे मयत विवाहितेचे नाव आहे. धारुर (Dharur) तालुक्यातील फकीर जवळा येथील सदाशिव चव्हाण यांच्या अनिता या मुलीचा विवाह गावातीलच बालासाहेब मोरे या युवकासोबत 6 वर्षांपूर्वी झाला होता. विवाहापासून सतत पैशासाठी अनिताला सासरची मंडळी शिवीगाळ करत मारहाण करायची. या जाचास कंटाळून मंगळवारी दुपारी अनिताने विष प्राशन केले.
अत्यावस्थ अवस्थेत अनिताला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात सासरच्या मंडळीने दाखल केले. मात्र मंगळवारी रात्री दहा वाजे दरम्यान तिचा मृत्यू झाला. बुधवार दिनांक 19 रोजी अनिताचे शवविच्छेदन केल्यानंतर फकीर जवळा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, अनिताची आई शारदा सदाशिव चव्हाण यांच्या फिर्यादी वरुन पती बालासाहेब शंकर मोरे, सासु कोंडाबाई शंकर मोरे व दीर रवी शंकर मोरे यांच्यावर सिरसाळा पोलिसांत (Police) बुधवारी सायंकाळी उशिरा आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सिरसाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदिप एकशिंगे पुढील तपास करत आहेत. मयत अनिता ही धारुर येथील पत्रकार सुनिल कावळे यांची भाची होती. तिच्या अकाली निधनाने धारुर येथे हळहळ व्यक्त होत आहे.