पुन्हा खुनाचा थरार… डोक्यात खोरे घालून पोलीस पाटलाला संपवले.

बीड दि.25 जून – बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील पोलिस पाटील भीमराव ससाणे यांच्या डोक्यात खोरे घालून त्यांना जिवे मारण्यात आल्याची घटना रात्री घडली. ही घटना जुन्या वादातून घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पिंपळनेर पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
(The thrill of murder again … The police killed Patla by putting a hole in his head.)
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हत्या (Murder), आत्महत्यांचे (Suicide) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी आष्टीत लेकाच्या मारहाणीत आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर धारुर शहरात तरुण व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. दिवसेंदिवस हत्या व आत्महत्येच्या (Suicide) घटनेत वाढ दिसत आहे.
काल गुरुवारी अंबाजोगाईत चुलत भावानेच आपल्या भावाचा गळा दाबून खून (Murder) केल्याची घटना समोर आली. हि घटना ताजी असतानाच रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान बीड (Beed) तालुक्यातील ढेकणमोहा येथे खुनाची दुसरी घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांनी मिळून पोलीस पाटलाची हत्या केल्याची माहिती मिळाली.
बीड (Beed) तालुक्यातील ढेकणमोहा येथील पोलिस पाटील भीमराव ससाणे यांच्या डोक्यात खोरे घालून त्यांना जिवे मारण्यात आले. ही घटना जुन्या वादातून घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मयताचा मुलगाही जखमी झाला असल्याची माहिती मिळाली.
सदर घटनेनंतर आरोपी मात्र फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक संतोष वाळके यांच्यासह पिंपळनेरचे पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पिंपळनेर ठाण्यात सुरू होती.