धारुर क्राईम…. महिलेचे प्रेत विहिरीत सापडले; माहेरच्या लोकांनी केला हत्येचा आरोप.

किल्लेधारूर दि.23 जुलै – धारुर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरात एका 24 वर्षे महिलेचे प्रेत विहिरीत सापडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून या महिलेचा मृत्यू आत्महत्या (Suicide) नसून हत्या (Murder) असल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने तेलगाव परिसरात खळबळ माजली आहे.
(Dharur Crime …. Woman’s body found in well; Maher’s men accused of murder.)
शिवकन्या ज्ञानेश्वर आडे (वय 24) असे मृत महिलेचं नाव असून ती व तिचा पती ज्ञानेश्वर आडे गुरुवारी दोघेच शेतामध्ये गेले होते. दरम्यान अचानक बायको गायब झाल्यामुळे सैनिक पतीने सर्वत्र शोध घेतला. संशयावरून एका विहिरीत पत्नी शिवकन्याने उडी मारली की काय या कारणाने विहिरीतील पाणी तीन मोटर लावुन उपसण्यात आले.
शुक्रवारी सकाळी सदर मृत महिलेचे प्रेत विहिरीत सापडले. दरम्यान, दिंद्रुड पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून मयत महिलेवर धारूर (Dharur) येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेत महिलेचा माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा (Murder) संशय असल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवालावरुन महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे सत्य बाहेर येणार असून पोलिसांनी (Police) मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले असल्याची माहिती कळते.