बीड जिल्ह्यात ‘कौटुंबिक हिंसाचारा’च्या गून्हेगारीत वाढ.

बीड दि.15 अॉगस्ट – बीड जिल्ह्यात (Beed) कोरोना काळामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घडणाऱ्या घटनेमध्ये, दुप्पटीने वाढ झाल्याची माहिती, खुद्द जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (Superintendent of Police) आर.राजास्वामी यांनी दिल्याचे वृत्त का आघाडीच्या दुरचित्रवाणीच्या पोर्टलवर प्रकाशित झाले आहे. ते म्हणाले, की दरोडा, लूटमार, चोऱ्या खुन (Murder) यासारख्या गुन्ह्यामध्ये मागच्या वर्षी पेक्षा कमी प्रमाण आहे.

(Increase in crime of ‘domestic violence’ in Beed district.)

गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दुपटीने वाढ झाली आहे. मागच्या वर्षी सात महिन्यात जवळपास 95 गुन्हे दाखल झाले होते. मात्र या वर्षी सात महिन्यात जवळपास 250 गुन्हे दाखल झाले आहेत. या वाढणाऱ्या घटनांविषयी पोलिसांसमोर असं आलं आहे, की कोरोनामुळं आता सर्व लोक गावाकडे आले आहेत. त्यामुळं घरात वाद होतात आणि त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic violence) घटनेत वाढ झालेली आहे.

यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी (Police) प्रत्येक उपविभाग स्तरावर पिंक मोबाईलची स्थापना केली आहे. आणि याची धुरा महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने होऊ शकतो. अशी माहिती पोलीस अधीक्षक (Superintendent of Police)आर. राजास्वामी यांनी दिली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात कुठे विवाहितेची आत्महत्या (suicide) तर कुठे बलात्कार (Rape), कुठे छेडछाड, यासारख्या गोष्टी घटना आता रोजच्याच होऊ लागल्या आहेत. एवढेच नाही तर मुलगा पाहिजे म्हणून सात गर्भपात करणारा शिक्षक आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून चक्क सुनेलाच भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडणारी सासू. जिल्ह्यात समोर आल्यानं पुरोगामी महाराष्ट्राची मान क्षरमेनं झुकत आहे. त्यामुळं अशा घटनांना रोखायचं असेल तर आता प्रत्येक माणसाने आपली मानसिकता बदलणे गरजेचं असून अशा घटनेतील आरोपींना कडक शासन होणे गरजेचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!