माझं गाव

धारुरच्या आणखी एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा कोरोनाने केला घात; मधूकर आण्णा भोसले यांचे निधन.

किल्लेधारूर दि.18 अॉगस्ट – धारुर (Dharur) शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी मधूकर नारायणराव भोसले (वय 73) यांचे कोरोनावर (Covid-19) उपचार सुरु असताना आज दुपारी 2 च्या सुमारास निधन (Corona death) झाले. मधुकर अण्णांच्या निधनाने शहरात दुख व्यक्त होत आहे.

(Corona death, another reputed merchant of Dharur; Madhukar Anna Bhosale passed away.)

शहरातील गायकवाड गल्लीतील रहिवाशी तथा प्रतिष्ठित व्यापारी मधूकर भोसले यांना 7 अॉगस्ट रोजी कोरोनाची लागण (Corona positive) झाली होती. त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज प्रकृती ढासळल्याने अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. (SRTR) रुग्णालयात हलवण्यात आले होते.

परंतू उपचार सुरु असतानाच दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. शहरात मुख्य रस्त्यावर वैष्णवी वस्त्र भांडार म्हणून त्यांचा व्यवसाय होता. आण्णा म्हणून सुपरिचित असलेल्या मधूकर भोसले यांची ओळख सतत हसतमुख व मिलनसार व्यक्तीत्व म्हणून होती. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाजोगाई (Ambajogai) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!