धक्कादायक … आईवर मुलाचा प्राणघातक हल्ला; मुलाने गळफास घेत केली आत्महत्या.

माजलगाव दि.1 सप्टेंबर – दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मालीपारगाव येथे घरगुती भांडणाच्या वादातून मुलांनेच आपल्या सख्ख्या आईवर विळयाने मानेवर वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. जखमी आईची तब्येत गंभीर असून बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान घाबरलेल्या मुलाने मालीपारगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे.
(Shocking … child attack on mother; The boy committed suicide by hanging himself.)
माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथील पारूबाई मच्छिंद्र कदम वय (50) व त्यांचा मुलगा बापू मच्छिंद्र कदम वय (30) वर्षे यांच्या घरगुती कारणावरून कुरबुरी होत असत. दरम्यान बुधवारी दुपारी दीड वाजता माय लेक रात भांडणाची सुरुवात झाली. यावेळी चिडलेल्या मुलांने विळा घेऊन आईच्या मानेवर वार केला. या त्याची आई हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून त्यांना तात्काळ माजलगावच्या (Majalgoan) ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
त्यांची चिंताजनक प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना बीड (Beed) येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. या घटनेने बापू कदम या मुलाने मालीपारगाव येथील शिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या (suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास पोलिस (Police) करत आहेत.