मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर तर्क वितर्काला उधाण; शिवसेना-भाजप युती होणार?

औरंगाबाद दि.18 सप्टेंबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल जाहीर भाषणात बोलताना भाजपला (BJP) पुन्हा एकदा मैत्रीची साद घातल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद (Aurangabad) येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केल्याने शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार का या चर्चांना कालपासून उधाण आले आहे.

(After the statement of the Chief Minister, the argument is over; Shiv Sena-BJP alliance?)

कालपासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु असून त्यांना सेना (Shiv sena) – भाजप एकत्र येणार असल्याचे वाटत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याने यावर चांगलीच चर्चा रंगली. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब (Anil Parab) तसेच इतर शिवसेना नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे. परंतु शिवसेना नेत्यांनी मात्र भाजपसोबत (Shiv Sena-BJP alliance) पुन्हा एकत्र येण्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनैसर्गिक आघाडी फार काळ टिकून राहात नाही. महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांना तसे वाटले असेल, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्या वक्तव्याला मी फारसे महत्त्व देत नाही. ते राज्याचे प्रमुख आहे. त्यांनी काय बोलावे, काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांना थट्टा मस्करी करण्याची सवय आहे. भाजपनेत्यांचा तणाव कमी करण्यासाठी ते असे बोलले असतील. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!