शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग; माजी शिक्षण मंत्रीही बाधित.

मुंबई, 28 डिसेंबर – महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं सध्या पहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवड यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.
(Corona infection to school education minister Varsha Gaikwad; Former education minister also disrupted.)
सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत राज्यात वाढ दिसून येत आहे. विद्यमान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा (Rajendra Darda), भाजपा आमदार समीर मेघे यांच्यासह आदिवासी विकास मंत्री (Minister for Tribal Development) के.सी. पाडवी (K. C. Padvi) यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री (Education Minister) वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. आता वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग (Corona infection) झाल्याने त्या अनेक मंत्री, आमदारांच्या संपर्कात आल्या होत्या त्यामुळे चिंता वाढली आहे.
अधिवेशनातील तब्बल 32 जणांना कोरोना
महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोन (Omicron) बाधितांचा आकडा वाढत असताना दोन दिवसांपूर्वी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली. भाजप आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मेघे यांनी फेसबुकवर (facebook) याबाबतची माहिती दिली होती. विशेष म्हणजे समीर मेघे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते.
त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट (Corona Test) करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.