लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली….

रांची दि.२२- राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरिकल सायन्समध्ये काल गुरुवारी रात्री दाखल करण्यात आले होते. त्यांना मूत्रपिंडाच्या विकारासह मधुमेह आणि रक्तदाबाच्या विकाराने ग्रासले आहे. यादव यांची कन्या मिसा भारती रुग्णालयात पोहोचल्या आहेत.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मूत्रपिंड ७५ टक्के बाधित झाले आहे. त्याची हानी रोखण्याचे आव्हान वैद्यकीय पथकापुढे आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) आणि पत्नी राबडीदेवी विशेष विमानाने रांचीला रवाना झाले आहेत. आरजेडी (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची नेमकी स्थिती जाणण्यासाठी आज शुक्रवारी त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. तर त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. रांचीतील होतवार कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यांनी गुरुवारी सायंकाळी श्वसनास त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे आरआयएमएस पथकाने त्यांची तपासणी केली. झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्यावर सुरू असणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.