महावितरणमध्ये अप्रेंटिस करणाऱ्या युवकाने घेतला गळफास ….

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) शहरांतील म.रा. विज महावितरण मध्ये काम करणाऱ्या मंगेश हनुमान कोसम वय (21) या तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली. पोलिसांनी (Police) घटनास्थळाचा पंचनामा केला.
महावितरण मध्ये काम करणारा युवक हा नांदेड शहरातला रहिवासी असून तो धारूर येथील महावितरण कंपनीमध्ये अप्रेंटिस करण्यासाठी आलेला होता. तो केज रोड येथील कोमटवार कॉम्प्लेक्समध्ये किरायाने राहतो. त्याचे दोन मित्र दिवाळीसाठी गावी गेले असून काल रात्री त्याला गावाकडून आजी वारली असल्याचा फोन आला होता. मात्र त्याने गळफास (suicide) घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. घटनास्थळी धारूर पोलीस (Police) स्टेशनचे पीएसआय प्रदीप डोलारे यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.