बीड व जालना जिल्हा हादरले; सरत्या वर्षात हत्या व आत्महत्येचा थरार.

बीड/जालना दि.31 डिसेंबर – आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी बीड व जालना जिल्ह्यात दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बीडमध्ये एका वृद्ध पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत निर्घृणपणे हत्या (Murder) केली. तर जालना जिल्ह्यात चार मुलासह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.
(Beed and Jalna districts shaken; Threats of murder and suicide in the last year.)
बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात खांडवी येथे आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. या विदारक घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी (Police) धाव घेतली.
या विषयी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, गेवराई (Gevrai) तालुक्यातील खांडवी येथील पिराजी शेजूळ (वय 65) यांनी त्यांची पत्नी संजीवनी पिराजी शेजूळ (वय 60) यांच्यावर आज पहाटेच्या दरम्यान कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या (Murder) केली. सदरील घटना गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावात खळबळ उडाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पिराजी शेजूळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्ह्याची कबूली शेजूळ यांनी दिली. मात्र खून कोणत्या कारणावरून झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जालन्यात चार लेकरांसह आईची आत्महत्या..
चार लेकरांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याची ह्रदयद्रावक घटना जालना (Jalna) जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव ता. अंबड येथे (गुरुवार) रात्री घडली. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज (शुक्रवार) सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली.
चार लेकरांसह विवाहितेने आत्महत्या केली असून, मृतांमध्ये एक मुलगा तीन मुलींचा समावेश आहे. घुंगर्डे हादगाव शिवारातील गट नंबर 93 मधील शेतातील विहिरीत या महिलेने लेकरांसह उडी घेऊन आत्महत्या केली असून, मृतांमध्ये गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी (वय 30), भक्ती ज्ञानेश्वर आडाणी (वय 12), ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी (वय 11), अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी (वय 8), युवराज ज्ञानेश्वर आडाणी (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.