बीड जिल्हा निकाल… केज, वडवणी व शिरुरमध्ये यांची बाजी.

बीड दि.19 जानेवारी – बीड (Beed) जिल्ह्यातील पाच नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी सुरु झाली असून केज व वडवणीत धक्कादायक निकाल हाती येत आहेत.

(Beed District Results … Kaij, Wadwani and Shirur.)

शिरुर कासारमध्ये (Shirur Kasar) भाजपाची मुसंडी असून आष्टी व पाटोदाचे निकाल मात्र अद्याप समोर आलेले नाहीत. शिरुरमध्ये पुन्हा भाजपाचा (BJP) झेंडा रोवणार असे चित्र दिसत आहे.

केज (Kaij) नगर पंचायतच्या 17 जागेवरील पहिल्या तीन फेऱ्यांचे निकाल समोर आले आहेत. यात जनविकास आघाडीने निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेसची मात्र दमछाक होत असल्याचे प्राथमिक स्तरावर दिसत आहे.

वडवणीमध्ये काटे की टक्कर
माजलगाव मतदारसंघातील वडवणी (Wadwani) नगर पंचायत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होत आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे बारा जागांचे प्राथमिक निकाल हाती आले असून भाजपा व राष्ट्रवादी प्रणित आघाडी समसमान जागेवर पुढे असल्याचे कळते.

जिल्ह्यात निवडणूक (election) होत असलेल्या नगरपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व होते. यापैकी केज नगर पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनामुळे येथील निवडणूका रखडल्या होत्या. केज व वडवणीत बदल दिसून येत आहे. दुपारी बारावाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार असून कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!