बीड पुन्हा हादरले… महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह आढळला; घटनास्थळी मिळाले रिव्हॉल्वर.

बीड दि.8 जुन – बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपुर्वी घडलेल्या गोळीबारीच्या घटनेनंतर आज बुधवारी सकाळी बीड शहरात एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह आढळला असून शेजारीच रिव्हॉल्वर (Revolver) मिळून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून सदर प्रकार खूनाचा की आत्महत्येचा याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज बीड शहरातील एका परिसरात 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. घटनास्थळी रिव्हॉल्वर देखील आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अक्षय भानुदास भांडवले (वय 20) राहणार बार्शी नाका बीड, असं मयत महाविद्यालयीन तरुणाचं नाव आहे.
बीड (Beed) शहरातील बार्शी रोड लगत असणाऱ्या तिरुपती नगरमध्ये, अक्षय भांडवले या महाविद्यालयीन विद्यार्थी तरुणाचा मृतदेह आज बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. घटनेची माहिती कळताच बीडच्या शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्राथमिक माहितीनूसार सदर तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांकडून (Police) अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. तरुणाचा खून (Murder) झाला की त्याने आत्महत्या (Suicide ) केली? याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
( Beed trembled again … The body of a college youth was found; Revolver found at the scene. )