आज धारुर चार; जिल्ह्यात पुन्हा द्विशतक २३०….

बीडः दि.१०आगस्ट- काल पाठवलेल्या ४५ अहवालात शहरातील ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत तर एक आज केलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळला आहे. बीड शहरात ॲन्टीजन टेस्टमध्ये आजही १३१ पॉझिटीव्ह सापडली आहेत. आजही जिल्ह्याचा आकडा २३० आहे.

शहरात गेल्या दहा दिवसात सतत आढळून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत काल सकाळी दोनने तर रात्री आलेल्या ३ पॉझिटीव्ह एक ॲन्टीजन अशी ४ धरुन आज सहाने वाढ झाली आहे. गेली तीन दिवस बीड शहरात व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट होत असुन यातही पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. कालच्या ॲन्टीजन टेस्टमध्ये १३१ व्यापारी पॉझिटीव्ह आढळली आहेत. यासह बीडची संख्या १६३, अंबाजोगाई व परळी प्रत्येकी १५, केज १३, माजलगाव ७, आष्टी ८ तर धारुर, गेवराई व शिरुरमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यामुळे आजची आकडेवारीही २३० वर गेली आहे. धारुरमध्ये आढळून येणाऱ्यात दोन नवीन तर दोन सहवासित आहेत. यात कसबा, कटघरपुरा व शिक्षक कॉलनीचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!