प्रेत घेवून नातलग थेट पोलिस ठाण्यात; खून्याला अटक करण्यासाठी जमाव आक्रमक.

केज दि.11 एप्रिल – मुलीचे लग्न माझ्याशी का लावून देत नाही म्हणून केलेल्या हल्ल्यात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. सदर प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह (Dead Body) चक्क केज पोलीस ठाण्यात आणला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

केज कळंब रस्त्यावर अडवून जबर मारहाण केल्याने गंभीर जखमी असलेल्या रमेश नेहरकर यांचा लातूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा हल्ला होऊन तीन दिवस झाले तर आज गंभीर जखमीला आपला जीव गमवावा लागाला. असे असतानाही पोलीसांना अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. यामुळे संतप्त नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करत मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (Assistant Superintendent of Police) (Pankaj Kumawat) यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

केज पोलिस ठाण्यात जवळजवळ 200 लोकांचा जमाव जमला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक (Police Inspector) शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistatnt Police Inspector) संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक (PSI) राजेश पाटील हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून ते नातेवाईकांशी चर्चा करीत आहेत. परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशा पावित्र्यात आहेत.

काय आहे सविस्तर घटना…
रमेश एकनाथ नेहरकर (वय 45) रा. पिसेगाव ता. केज हे केज (Kaij) येथील सानेगुरुजी ऊसतोड कामगार मुलांच्या शाळेत सेवक म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले होते. हे फोटो भागवत चाटे रा. तांबवा (ता. केज) या तरुणाने केल्याचे समजले. त्यामुळे रमेश नेहरकर यांनी तु फोटो का? व्हायरल केले असा जाब विचारला. यावेळी भागवत चाटे याने तुझ्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून दे असे म्हणत जर लग्न लावून नाही दिले नाहीतर बघून घेतो अशी धमकीही दिली होती. दरम्यान शनिवारी (दि.9) रमेश नेहरकर हे दुचाकी क्रमांक एम. एच. 44 एफ 4832 वरुन कळंब येथून केजकडे येत होते.

यावेळी दुपारी साडेतीन च्या सुमारास पाठी मागून डिस्कव्हर दुचाकीवर आलेल्या तिघांनी रमेश यांच्यावर हल्ला केला. जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने पाठी मागून डोक्यावर मारल्याने रमेश नेहरकर जागीच कोसळले. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेश यांना पाहून प्रावाशांनी याची माहिती केज पोलीसांना दिली. माहिती मिळताच पोलीसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत करत दवाखान्यात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने लातूरला (Latur) हलविण्यात आले.

या प्रकरणी पुष्पा रमेश नेहरकर यांच्या फिर्यादीवरून (complaint) आरोपी भागवत चाटे व इतर अनोळखी दोघे असे तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु लातूर येथे उपचारादरम्यान रमेश नेहरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. घटना घडून तीन दिवस उलटली आहेत. तर गंभीर जखमीने आपला जीव गमावलेला आहे. पोलिसांनी आरोपीना अटक कारवाई केली नसल्याने संतप्त नातेवाईक मयताच्या प्रेतासह केज पोलिस ठाण्यात ठिय्या देवून आहेत.

( Corpse directly to police station; Relatives aggressive to arrest killer. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!