क्राईम

Crime पतीने पत्नीला चाकूने भोसकले ; आता तुझा नंबर…

63 / 100

अंबाजोगाई दि.2 मे – Crime अंबाजोगाई येथील अंबिका कॉलोनीत खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या पत्नीस पतीने चाकूने भोसकल्याची घटना घडली असून बहिणीला फोन करुन आता तुझा नंबर, बघून घेतो म्हणत धमकी दिली. याबाबत अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपी फरार झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई येथील अंबिका कॉलोनीत भाग्यश्री मयुर शर्मा (वय 38) या विवाहितेवर पतीने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. बारा वर्षापूर्वी भाग्यश्री व मयुर यांनी अंतरजातीय विवाह केला होता. सहा वर्षापूर्वी पासून मयुर यास दारुचे व्यसन लागल्याने भाग्यश्री पतीपासून मानवलोक संस्थांच्या मनस्विनी प्रकल्पात विभक्त राहत होती. तिने पतीच्या विरोधात घटस्फोटासाठी तक्रार केली. याचा राग मनात धरुन मयुरने सोमवारी भाग्यश्री काम करत असलेल्या रुग्णालयात जावून तिला बोलावून अंबिका कॉलोनीतील हनुमान मंदिरासमोर नेले. तिथे सोबत आणलेला चाकू पत्नी भाग्यश्री हिच्या पोटात भोसकले. यानंतर आरोपी पती मयुर बाबुलाल शर्मा तिथून पसार झाला. भाग्यश्री काम करत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमी भाग्यश्रीस स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल केले. भाग्यश्रीची प्रकृती अत्यंत गंभीर असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

बहिणीला दिली धमकी
आरोपी मयुर याने या घटनेनंतर आपल्या सख्खी बहिण कोमल पंचारिया हिला फोन करुन आत्ताच पत्नीचे काम काले आता तुझा नंबर म्हणत मी तुला दाखवतो म्हणून धमकी दिली. घाबरलेल्या बहिणीने तात्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!