शेती विषयक

आजपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाचे संकट; बीडसह या जिल्ह्यांना अलर्ट.

मुंबई दि.7 मार्च – मराठवाड्यातील बीड (Beed), औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांत मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान (IMD) विभागाने वर्तवला आहे.

( Crisis of untimely rains in Marathwada from today; Alert to these districts including Beed. )

बीड जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. राज्यातील काही भागांत तापमानात वाढ झाली आहे. येत्या चार दिवसांत महाराष्ट्रात (Maharashtra) विजांच्या कडकडाटासह हलका ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान (IMD) विभागानं वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे राज्यात याचा परिणाम दिसत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात वादळ, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अलर्ट –
महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक आहे. मराठवाड्यातील बीडसह औरंगाबाद (Aurangabad), जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत मध्यम ते हलका पाऊस कोसळेल. तसेच नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यासह विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये वादळासह मुसळधार पावसाची (heavy rains) शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांत हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात शनिवार व रविवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या राज्यभर शेतात हरभरा, कांदा आणि हळदीचे पीक असल्याने शेतकऱ्यांची चांगली धावपळ उडणार आहे. हरभरा काढणीला आला असून त्यावर अवकाळी पावसाचा (untimely rains) परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांकडून करण्यातर येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!