हवामान

Cyclone Mocha चक्रीवादळाचा इशारा ; महाराष्ट्रासह दोन राज्यात अलर्ट.

54 / 100 SEO Score

मुंबई दि.7 मे – Cyclone Mocha चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 7 मे पासून पुढील तीन दिवस महाराष्ट्र, केरळ व तामिळनाडूला याचा फटका बसण्याची शक्यता Meteorological Department of India कडून वर्तवण्यात आली आहे. Cyclone Mocha Warning; Alert in two states including Maharashtra.

महाराष्ट्रात गेल्या महिन्यात अवकाळी पावसाचे Unseasonal Rain थैमान सुरु आहे. आणखीन ही अनेक भागात पाऊस कोसळत असताना आता नवीन संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून वर्षाचे पहिले मोचा चक्रीवादळ Cyclone Mocha तयार झालं आहे. त्यामुळे अंदमान, निकोबार, केरळ, तामिळनाडू या भागात 12 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्र राज्यावर होणार आहे. आज दि.7 मे पासून पुढील तीन दिवस वादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार आहे. मराठवाड्यातही जोरदार वारे, वीजांचा गडगडाट व पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने Meteorological Department of India वर्तवली आहे .

Mocha चक्रीवादळाचा ( Cyclone Mocha ) प्रभाव हळूहळू अनेक राज्यात दिसून येत आहे. वादळ तीव्र होण्याच्या दिशेने आजपासून अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली असून अनेक भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात 8 मे ते 12 मे दरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्याचवेळी, 8 ते 11 मे दरम्यान किनारपट्टी आणि सीमावर्ती भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. 7 मे पासून आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि अंदमान समुद्राच्या लगतच्या भागात 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. हा वाऱ्याचा वेग 60 किमीपर्यंत पोहोचण्याची व मुसळधार ते अति मुसळधार पाऊस Unseasonal Rain होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!