आज ४० स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; पाच शहरात उद्यापासून ॲन्टीजन टेस्ट

किल्लेधारूर दि.१७(वार्ताहर) काल ४० लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असलेल्या पाच शहरात उद्यापासुन सलग तीन दिवस सर्व व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यास सुरुवात होणार आहे.

शहरात गेल्या सतरा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. काही प्रमाणात ग्रामीण भागातही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. घागरवाडा, गोपाळपुर, उमरेवाडीतही रुग्ण आढळून आली. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ४० लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. धारुर तालुक्यात आजपर्यंत ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन केलेल्या माजलगाव, परळी, केज, आष्टी व अंबाजोगाई शहरात उद्या दि.१८ सकाळी ८ पासुन सर्व व्यापाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करण्यास सुरुवात होत आहे. सदरील चाचणीत सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना समाविष्ट करण्यात आलेले आहे. दि. १८, १९ व २० अॉगस्ट पर्यंत या चाचण्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. दि.२१ पर्यंत लॉकडाऊन असून चाचणी झाली नसल्यास व्यापाऱ्यास आपले दुकान उघडता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!