धनंजय मुंडे भाजपच्या रडारवर; फडणवीस, मेटे, सोमय्या यांचे संकेत.

बीड 8 नोव्हेंबर – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सध्या भाजपच्या रडारवर असल्याचे दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे (Vinayak Mete) व भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टिकेतून संकेत मिळत आहेत.

(Dhananjay Munde on BJP’s radar; Indications of Fadnavis, Mete, Somaiya.)

परळी शहरात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मतदार संघातील लोकासाठी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील हलगे गार्डन वरील कार्यक्रमात हरियाणा डान्सर सपना चौधरीच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामुळे मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

धनंजय मुंडे यांना सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary) ठुमक्यानंतर वेळ मिळाला तर बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न सोडवावे, असा खोचक टोला आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी लगावला आहे.

आ. विनायक मेटे…
बीडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. 7 वर्षांच्या मुलानं सुरु केली बँक, झाले 2000 सदस्य; काम बघून वाटेल अभिमान अहमदनगरमध्ये होरपळून अकरा लोकांचा मृत्यू झाला तेही सरकारी दवाखान्यात झाला त्याचे एवढे मोठे दुखाचे सावट असताना, शेतकऱ्याला आजही पैसे मिळाले नाहीत त्यांची दिवाळी काळी साजरी होत असताना, एसटी कामगार उपाशीपोटी न्याय हक्कासाठी धरणे धरून बसले ते दिवाळी साजरी करत नाहीत हे प्रश्न सोडून सामाजिक न्यायमंत्री सपना चौधरीचे ठुमके पाहतात हे दुर्दैव आहे.

काय म्हणाले फडणवीस ?
राज्यातील शेतकरी आत्महत्या (Suicide) करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर गेलेत आणि मंत्री मात्र नाचगाण्यात मग्न आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता केली आहे.

भाजपला (BJP) आम्ही मातीत गाडून टाकू असे एका मंत्र्याने म्हटलं आहे. अरे वेड्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीतून उभी राहिली आहे. दोन वरुन 302 वर गेलेली ही पार्टी आहे. 4 ते 6 खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सांगण्याचे कारण नाही आहे. आम्हाला मातीत गाडून टाकणारे स्वतः गाडले गेले परंतु आम्हाला गाडू शकले नाही. हे आम्हाला सांगत आहेत की भाजपला गाडून टाकू पण त्यांना एवढेच सांगतो की, भाजपचा एक कार्यकर्ता हा देखील तुमचा मुकाबला करण्यासाठी पुरेसा आहे. कृपया अशा वल्गना करु नका सामान्य माणसाच्या हिताचे काम करा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना नाव न घेता दिला आहे.

किरीट सोमय्यांचे मुंडेकडे बोट.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्याचे कंत्राट त्यांनी जावयाच्या जयोस्तुते कंपनीला दिल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. त्यानंतर या कंपनीचे कंत्राट रद्द झाले. आता सोमय्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडेही बोट दाखवले आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जावयाला ग्रामविकास मंत्रालयाचे 15 हजार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. हे कंत्राट आता रद्द करण्यात आले आहे. ठाकरे सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनीही जयोस्तुते कंपनीला कंत्राट दिले आहे. धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयानेही जयोस्तुतेला कंत्राट दिले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!