माझं गाव

धारुर परिसर… चुलत्याला भेटण्यासाठी आलेल्या पुतण्याचे अपघाती निधन.

किल्लेधारूर दि.2 सप्टेंबर – धारुर तालुक्यातील कारी येथील तरुण आपल्या चुलत्याला भेटण्यासाठी केज (Kaij) तालुक्यातील होळ येथे गेला असता आज सकाळी त्याचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

(Dharur area … Accidental death of nephew who came to meet his cousin.)

केज अंबाजोगाई रोडवरील होळ नजीक एका रुग्णवाहिकाने (Ambulance) तरुणास धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.2) रोजी सकाळी घडली आहे. धारूर (Dharur) तालुक्यातील कारी येथील संतोष रामभाऊ मुजमुले (वय 27) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण होळ येथे राधाकिसन मुजमुले या त्याच्या चुलत्याला भेटण्यासाठी आला होता.

होळ येथे गेली कितेक दिवसा पासून राहत असल्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा झाल्याने पुतण्या होळला आला होता. आज सकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेने मॉर्निंग वॉकला (Morning walk) जात असताना त्याला रुग्णवाहिकेने धडक दिली. या अपघातात (Accident) जबर जखमी झालेल्या संतोषचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका क्र. AP- 27 W-5088) केज कडुन अंबाजोगाईकडे (Ambajogai) जात होती. अपघातानंतर रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!