दिलासादायक … बससेवा सुरु; कर्मचाऱ्यांचा संप मागे.

किल्लेधारूर दि.28 अॉक्टोंबर – आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला होता, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 12 टक्क्यांवरू 28 टक्के करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. आता हा बंद कर्मचाऱ्यांनी मागे घेतला असून तात्काळ बससेवा सुरु करण्यात आली आहे. रात्री धावणाऱ्या सर्व गाड्या सुरु होत असल्याची माहिती धारुर (Dharur) आगाराचे आगार व्यवस्थापक (Manager) शंकर स्वामी यांनी दिली.
(Comfortable … bus service started; Employees strike back.)
आजच्या बंदमुळे एसटीची जिल्ह्यातील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बंदची कल्पना बऱ्याच प्रवाशांना नव्हती त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. आज बेमुदत बंदमुळे धारुरसह जिल्ह्यातील सर्व डेपोतून (Depot) एकही गाडी सुटली नव्हती. ऐन दिवाळीच्या (Diwali) हंगामात कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने परिवहनलाही मोठा तोटा झाल्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. तसेच इतर भत्तेही एसटी कर्मचाऱ्यांना लागू करावेत अशी मागणी केली होती. प्रवाशांना ऐन दिवाळत या त्रासाला सामोरे जावे लागले. दोन दिवसांपूर्वी राज्यात एसटीने (ST Bus) जवळपास 17 टक्क्यांची भाडेवाढ केली होती. दिवाळीच्या हंगामात ही भाडेवाढ केल्याने प्रवाशांना याची झळ बसत आहे. त्यात आता आजच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या मागण्या मान्य?
एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे सहाजिकच 30 कोटी रूपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबतची कामगार संघटनांची बैठक संपली असून अखेर संप मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.
बेस्ट कामगार संघटनांसोबतची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली सह्याद्रीवरही बैठक झाली. या बैठकीमध्ये दिवाळी बोनससह कामगार संघटनांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर बैठकीत झाली चर्चा झाली. उद्या पुन्हा एकदा कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) निर्णय जाहीर करणार आहेत.
धारुर – मुंबई धावणार…
किल्लेधारूर येथून सांयकाळी 7.20 ला सुटणारी धारुर ते मुंबई बस तासभरधावणार असून सर्व बस सेवा सुरळीत होत असल्याची माहिती धारुर आगाराचे व्यवस्थापक शंकर स्वामी यांनी दिली.