घात-अपघात

farmer suicide धारुर तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.

54 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.11 मे – farmer suicide धारुर तालुक्यात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अवकाळी पावसाने शेतातील पिक उध्वस्त झाल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. farmer suicide … A young farmer committed suicide in Dharur taluka.

धारुर Dharur तालुक्यातील ढगेवाडी येथील शिवाजी बलभिम अंडील (अंदाजे वय 35) या तरुण शेतकऱ्याने काही दिवसापुर्वी विषारी दृव्य प्राशन केले होते. आज दि.11 गुरुवारी विषारी दृव्य प्राशन करणाऱ्या  या तरुणाचे उपचार सुरु असताना निधन झाले. पिकाची नासाडी व कर्जाच्या बोजामुळे आणखी एका शेतकऱ्याने   आत्महत्या farmer suicide केल्याची घटना समोर आली आहे. तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात 40 गुंठ्ठे क्षेत्रात मिरचीचे पिक घेतले होते. गेल्या महिनाभरापासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीत सदर पिकाची नासाडी झाली. डोक्यावर बँकेचे कर्ज असल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मयत शेतकऱ्याच्या farmer suicide पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!