पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा…

मुंबई: दि.१६- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे (Pooja Chavan suicide case) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला. दबाव रहीत तपासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची (Pooja Chavan suicide case) गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी कारवाई केलेले हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाने फास आवळला होता. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा अशी मागणी केली.

(CM Uddhav Thakre sack MLA Sanjay Rathod in Pooja Chavan suicide case)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!