घात-अपघात

हृदयद्रावक… 13 महिलांचा विहिरीत पडून मृत्यू; तर बीड जिल्ह्यात ट्रॅक्टर-पिकअपच्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू .

गेवराई/कुशीनगर दि.17 फेब्रुवारी – बुधवारची रात्र अनेकांच्या जीवावर बेतली आहे. बीड ( Beed ) जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक होवून झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री एका लग्न सोहळ्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या 13 महिलांना विहिरीत पडल्यामुळे जीव गमवावा लागला आहे.

( Heartbreaking … 13 women die after falling into a well; Baap-Leka died in a tractor-pickup accident in Beed district. )

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात ( Accident ) ऐवढा भिषण होता की, यामध्ये राक्षसभुवन येथील चंद्रशेखर शामराज पाठक ( वय वर्ष 39 ) व त्यांचा मुलगा आर्यन ( वय 12 ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक ( वय 11 ) हिच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले.

अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

उत्तर प्रदेशात घडली हृदयद्रावक घटना…
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री एका लग्न सोहळ्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या महिलांना विहिरीच्या स्लॅबवर उभे राहणे जीवावर बेतले आहे.

हळदीच्या कार्यक्रमादरम्यान विहिरीचा स्लॅब कोसळल्यामुळे 13 मुली आणि महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र तोवर 13 महिला मृत झाल्या.

उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh ) नेबुआ नौरंगिया ठाणे परिसरातील नौरंगिया शाळा टोलामध्ये एका घरात लग्न होते. यादरम्यान गावातल्या महिला आणि मुली लग्न सोहळा ( Marriage ceremony ) असलेल्या घराजवळील एका विहिरीवर उभ्या होत्या. यादरम्यान हळदीचा कार्यक्रम सुरू होता. पण अचानक विहिरीवर असलेली लोखंडी जाळी तूटली आणि महिला, मुली विहिरीत पडल्या.

या घटनेची माहिती मिळताच त्वरित पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केली. आतापर्यंत 13 महिला आणि मुलींचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलीस ( Police ) आणि गावकऱ्यांची गर्दी केली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!