‘त्या’ खूनाचे गुढ उलगडले; एक जण पोलिसांच्या ताब्यात.

नेकनूर दि.30 जून – काल खळबळ उडवून दिलेल्या लिंबागणेश येथील तरुणाच्या खूनाचे (Murder) गुढ (mystery) उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या काही तासात नेकनूर पोलिसांनी (Police) अपघाताचा बनाव रचून दिशाभुल करण्याचा प्रयत्न केलेल्या या गुन्हाचा तपास लावल्याने त्यांचे कौतूक होत आहे.
(The mystery of ‘that’ murder was revealed; One in police custody.)
खून करून तरुणाच्या बुलेट गाडीसह त्याचा मृतदेह मांजरसुंबा घाटात रस्त्याच्या कडेला टाकून हा अपघात (Accident) असल्याचा देखावा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीनी केला होता. मात्र नेकनूर पोलिसांनी ही घटना घडून चोवीस तासाच्या आत एका आरोपीला बेड्या ठोकून अटक केली आहे, सदरील खून सोमवारी 28 जून ते 29 जून च्या मध्यरात्री घडल्याचे समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की लिंबागणेश येथील तरुण निलेश शहादेव ढास (वय 25) या तरुणाचा कोणीतरी डोक्यामध्ये शस्त्राचा जोरदार वार करून त्याचा खून करून, हा खून (Murder) नसून अपघात आहे हे दर्शविण्यासाठी त्या तरुणाचा बुलेटसह त्याचा मृतदेह मांजरसुंबा येथील घाटामध्ये (Manjarsumbha Ghat) रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. हा अपघात (Accident) झाला आहे असे दर्शविण्यासाठी आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले.
परंतु ही माहिती नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व त्यांचे सहकारी अमोल नवले, दीपक खांडेकर, राठोड त्याच बरोबर बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तो मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून हा अपघात नसून हा घातपात असल्याचा अंदाज बांधला.
त्यानुसार नेकनूर पोलिसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवून हा घातपात असल्याचे निष्पन्न केले. यात एका आरोपीला नेकनूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीने पोलीसांना गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा मयताच्या अगदी जवळचा नातेवाईक असल्याने त्याने हा खून का केला ? याची चौकशी सुरू असून, खून झालेल्या तरुणाचे वडिल शहादेव ढास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.