राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे ? जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तिसरे प्रदेशाध्यक्ष पद.

बीड दि.25 मार्च – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) महिला प्रदेशाध्यक्षपदी हेमा पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या बातम्या सोशल माध्यमातून व्हायरल झाल्या आहेत . रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर बीड (Beed) जिल्ह्यातील हेमा पिंपळे व रेखा फड चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दोन दिवसांपुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्षा म्हणून नेमकी कोणत्या महिला नेत्याची नियुक्ती होणार याची चर्चा सुरु आहे. यातच आता बीडच्या हेमा पिंपळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. मात्र अद्याप राष्ट्रवादीकडून तसे जाहिर करण्यात आलेले नाही.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांच्यासह बीडच्या रेखा फड व ॲड. हेमा पिंपळे चर्चेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या निकटवर्तीय म्हणून हेमा पिंपळे यांची ओळख आहे.

हेमा पिंपळे यांचा परिचय…
वकील असलेल्या हेमा पिंपळे या 20 वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. हेमा पिंपळे (Hema Pimple) यांनी शिवसेनेत नऊ वर्षे काम केले होते. त्यावेळीही त्यांनी महिला आघाडी जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना महागाईविरोधात आंदोलन केले होते. शासकीय अधिकाऱ्यांना बांगड्या भेट देऊन आंदोलनही केले होते. 2010 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्ष म्हणून साडेसात वर्ष कार्यरत होत्या. नुकत्याच झालेल्या हिजाब समर्थनार्थ ॲड. हेमा पिंपळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते.

बीडला राष्ट्रवादीचे तिसरे प्रदेशाध्यक्ष पद…
मराठवाड्यात बीड जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. राष्ट्रवादीला भरभरून देणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना माननारा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे.

यापुर्वीही राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षा पद ॲड. उषाताई दराडे यांनी सांभाळले आहे. जर पिंपळे यांची निवड झाली तर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विविध सेलचे हे तिसरे प्रदेशाध्यक्ष पद असणार आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील युवा कार्यकर्ते महेबुब शेख हे राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष तर अंबाजोगाई येथील डॉ. नरेंद्र काळे हे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

( Hema Pimple as NCP Women’s State President ? NCP’s third state president post in the district. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!