बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी… नगर पंचायत निवडणूकीत मातब्बरांना चपराक.

बीड दि.19 जानेवारी – बीड (Beed) जिल्ह्यातील पाच नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी पुर्ण होवून सर्व निकाल हाती आली आहेत. मतमोजणीनंतर जिल्ह्यातील अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे.
(List of winning candidates in Beed district …)
जिल्ह्यातील केज, वडवणी, आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या पाच नगर पंचायतच्या निवडणूका होवून आज मतमोजणी पार पडली. यात जिल्ह्यातील पाच पैकी 3 नगर पंचायती भाजपाच्या ताब्यात तर एक राष्ट्रवादी काँग्रेस व एका वर जनविकास पॕनलने मुसंडी मारली आहे.
आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तीन नगर पंचायतीवर आ. सुरेश धस यांनी आपली एकहाती सत्ता अबाधित ठेवली आहे. यामुळे आ. बाळासाहेब आजबे यांना मोठा धक्का मानला जात आहे. मतदारसंघातील तीन्ही नगर पंचायतीवर भाजपाचे (BJP) निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यातील केज नगर पंचायतवर जनविकास आघाडीने मुसंडी मारली. काँग्रेस या निवडणूकीत केवळ तीन जागेवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पाच जागेवर विजय मिळवला आहे. जनविकास आघाडीने 8 जागा जिंकल्या असून एका अपक्षाने विजय मिळवला आहे.
केज नगर पंचायतच्या सत्तेची चावी अपक्षाच्या हातात असणार आहे. केजमध्ये विद्यमान खासदार रजनीताई पाटील (Rajni Patil) यांना मोठा धक्का बसला. यापाठोपाठ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोणवने यांच्या मुलीचा पराभव झाला असून सोणावने यांना हा पराभव जिव्हारी लागणारा ठरत आहे.
वडवणी नगर पंचायतच्या निवडणूकीत भाजपाचे नेते राजाभाऊ मुंडे यांचा पराभव झाला आहे. अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व असलेल्या नगर पंचायतमध्ये त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला. राष्ट्रवादी प्रणित विकास आघाडीने नऊ उमेदवार विजयी झाले असून आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) व माजी आ. केशवराव आंधळे यांनी मोठे परिवर्तन घडवले आहे.
जि.प.चे बांधकाम सभापती जयसिंग सोळंके यांनी वडवणी नगर पंचायत प्रतिष्ठेची बनवली होती. हि निवडणूक तरुणाईच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे जयसिंग सोळंके (Jaising Solanke) विरुध्द भाजपाचे बाबरी मुंडे अशी होती. माजलगाव मतदारसंघातील वडवणी नगर पंचायतवर आ. सोळंके यांनी वर्चस्व मिळवले.
आष्टी (Ashti) विजयी उमेदवार…
वाल्हेकर सुरेखा शाम (भाजपा)
सहस्त्रबुद्धे शैलेश पुरुषोत्तम (भाजपा)
मुरकुटे भारत धोंडीराम (भाजपा)
नुरजहाँबी नवाबखाँ पठाण (भाजपा)
सुरवसे विजय विमल (राष्ट्रवादी)
शेख शरमीन ताजोद्दीन (भाजपा)
शेख फातेमाबी हारुण (अपक्ष)
राऊत ज्ञानदेव रघुनाथ (अपक्ष)
शेख शमीम रशीद (अपक्ष)
धोंडे अक्षय सुरेश (अपक्ष)
शेख नाजिम रशीद (राष्ट्रवादी)
बेग मिर्झा आयशा इनायत्तुल्ला (भाजपा)
वारंगुळे सुरेश आदीनाथ (भाजप)
झरेकर किशोर हिराचंद (भाजपा)
रेडेकर पंखाबाई लक्ष्मण (भाजपा)
धोंडे पल्लवी स्वप्नील (भाजपा)
शिकरे महादेव दिलिप (काँग्रेस)
पाटोदा (Patoda) नगर पंचायत विजयी उमेदवार
आढागळे किशोर परमेश्वर (भाजपा)
काळे आश्विनी हनुमंत (अपक्ष)
बामदणे शरद आश्रुबा (भाजपा)
जाधव महादेव बाबासाहेब (भाजपा)
वाघमारे निलावती कुंडलिक (भाजपा)
गिते रोहिदास (भाजपा)
जाधव निर्मला संतोष (अपक्ष)
सौदागर असिफ अब्दुल्ला (अपक्ष)
गोरे आरती रामेश्वर (अपक्ष)
मकरानी उमर जुबेर (काँग्रेस)
जाधव दिपाली राजेंद्र (भाजपा)
जाधव राजेंद्र आसाराम (राष्ट्रवादी)
पोटे बळीराम बाबासाहेब (भाजपा)
सय्यद अब्दुल्ला यासीन (भाजपा)
पठाण शाहिनबी मजीदखाँ (अपक्ष)
सय्यद खतीजाबी उमर (अपक्ष)
गिते पाटील अनिता श्रीहरी (भाजपा)
वडवणी (Wadwani) नगर पंचायत विजयी उमेदवार
वाघमारे द्रोपदी भगवान (राष्ट्रवादी)
मुंडे मंगल राजाभाऊ (भाजपा)
सानप देवीरथ शिवराम (भाजपा)
आंधळे किस्कींदा दिनकरराव (राष्ट्रवादी)
जगताप वंदना शेषेराव (राष्ट्रवादी)
राठोड गिन्यानदेव बालु (भाजपा)
मुंडे बन्सी केशवराव (अपक्ष)
पठाण मेहताबबी अब्दुल (भाजपा)
कुरेशी अस्लम अन्सार (राष्ट्रवादी)
उजगरे मिरा भीमराव (भाजपा)
आळणे नेहा नागेश (राष्ट्रवादी)
ढोले मिरा सुधीर (भाजपा)
टकले हरिदास किसनराव (भाजपा)
शिंदे मिनाक्षी संभाजी (राष्ट्रवादी)
नहार रुपिका विजय (भाजपा)
डिगे रंजना नागनाथ (अपक्ष)
घाडगे उषा उत्तम (राष्ट्रवादी)
केज (Kaij) नगर पंचायत विजयी उमेदवार
शेख अझरुद्दीन बशीरोद्दीन (राष्ट्रवादी)
कराड आशाबाई सुग्रीव (जनविकास)
पाटील आदित्य आशोकराव (काँग्रेस)
अंधारे शकुंतला सज्जन (जनविकास)
गाढवे सोजरबाई शिवाजी (राष्ट्रवादी)
जाधव बालासाहेब दत्तात्रय (राष्ट्रवादी)
बनसोड सिता प्रदिप (जनविकास)
इनामदार आलियाबेगम हारुण (जनविकास)
शिंदे पद्मिन गुलाब (जनविकास)
इनामदार रेश्मा जलालोद्दीन (जनविकास)
इनामदार तरमीमबेगम (जनविकास)
गुंड सोमनाथ बाळासाहेब (काँग्रेस)
दांगड शितल पशुपतीनाथ (काँग्रेस)
शेख तसलीम युनूस (राष्ट्रवादी)
गुंड रामचंद्र विठ्ठलराव (राष्ट्रवादी)
रांजणकर पल्लवी ओमप्रकाश (स्वाभिमानी)
खतीब सद्दाम मुश्ताक (जनविकास)
शिरुर (Shirur) नगर पंचायत विजयी उमेदवार
भागवत थोरात (भाजपा)
शिवराम कातखडे (राष्ट्रवादी)
दत्तात्रय गाडेकर (भाजपा)
वैजयंता तळेकर (भाजपा)
अर्जून गाडेकर (शिवसेना)
गणेश भांडेकर (भाजपा)
प्रतिभा पाटील (भाजपा)
संगिता गाडेकर (भाजपा)
प्रियंका उटे (भाजपा)
अमृता चव्हाण (राष्ट्रवादी)
शेख नसीर शहेनाज (राष्ट्रवादी)
सुनिता रणखांब (शिवसेना)
श्वेता देसरडा (भाजपा)
मोहिनी भालेराव (भाजपा)
गयाबाई गायकवाड (राष्ट्रवादी)
भगवान सानप (भाजपा)
उध्दव घोडके (भाजपा)