राजकीय

Maharashtra Politics सत्तासंघर्षाचा निकाल ; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय.

46 / 100 SEO Score

नवी दिल्ली दि.10 मे – Maharashtra Politics सत्तासंघर्षाचा निकाल वाचनास दि.11 मे गुरुवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटाला सुरुवात झाली. सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड यांनी निकाल वाचन केले. निकाल वाचनात सर्वप्रथम आमदार अपात्र प्रकरण सात न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आलं. निकालात शिंदे गटाचे प्रतोद नेमणूक बेकायदेशीर ठरवलं असून राज्यपालांच्या कृतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. उध्दव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा त्यांना अडचणीचा ठरला आहे. मात्र यापुढे विधिमंडळात काय होणार याकडे लक्ष लागुन आहे.

निकालातील प्रमुख मुद्दे…
1. 16 आमदार अपात्रता सत्तासंघर्षाचे प्रकरण 7 न्यायमुर्तींच्या घटनापिठाकडे.
2. नबाम रेबिया केसमध्ये उत्तरं सापडत नाही.
3. घटनापीठाने 10 प्रश्न तयार करुन प्रकरण 7 न्यायमुर्तींच्या घटनापिठाकडे सोपवंल.
4. व्हीप फक्त राजकीय पक्ष देवू शकतो. हा व्हीप दहाव्या सुचीसाठी महत्वाचा.
5. 3 जुलैला फुट पडली हे अध्यक्षांना माहित होतं. अध्यक्षांनी याची चौकशी करायला पाहिजे होती.
6. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर.
7. मीच खरी शिवसेना असा दावा कुणीच करु शकत नाही.
8. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.
9. शिंदे गटाने कोणत्याही पत्रात पाठिंबा काढला असल्याचे सांगितले नाही.
10.बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरु शकत नाही.
11. राज्यपालाचे सर्व निर्णय चुकीचे
12. जुनं सरकार पुन्हा आणण्याची शक्यता कोर्टाने फेटाळली.
13. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षाकडे.
14. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

सरकार घटनाबाह्य असल्यावर शिक्कामोर्तब…
शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर व घटनाबाह्य असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया खासदाय संजय राऊत यांनी दिली. निकालात न्यायालयाने 16 आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे दिला असून न्यायालयाच्या निकालातील मुद्यावरुन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!