Maharashtra Politics महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या ; काय आहे शक्यता …

नवी दिल्ली दि.10 मे – Maharashtra Politics महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या दि.11 मे गुरुवारी जाहिर केला जाणार असल्याची माहिती सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड यांनी दिली. यामुळे महाराष्ट्रात येत्या 48 तासात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. Maharashtra Politics .. Result of Maharashtra power struggle tomorrow; What are the odds…
गेल्या नऊ महिन्यापासून सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर आता मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टानं Supreme Court राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा Maharashtra Politics निकाल उद्या दि.11 मे रोजी जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या Supreme Court घटनापीठाकडून हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्याकाही दिवसांपासून सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत महाराष्ट्रासह देशभर उत्सूकता आहे. दरम्यान दोन्ही बाजूकडून सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा केला जात आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न या निकालात असणार आहे.