शनिवार व रविवार जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन; पहा काय राहणार सुरु.

बीड दि.11 जून – राज्य सरकारने अनलॉकची (unlock) प्रक्रिया सुरु करून तसे निर्देश दिल्यानंतर बीड जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश दि.6 जून रोजी जारी करण्यात आले. बीड जिल्हा तिसऱ्या गटात येत असल्याने बीड जिल्ह्यात दि.7 सोमवार पासून हॉटेल, सलूनसह सर्व दुकाने उघडण्यात आली आहेत. सध्या सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु आहेत. मात्र, उद्या शनिवार व रविवार जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन असणार आहे.
(Weekend lockdown in the Beed district; See what’s going on.)
अत्यावश्यक सेवेतील (essential service) दुकाने आठवड्याचे सर्व दिवस तर इतर दुकाने शनिवार रविवार वगळता इतर 5 दिवस उघडण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यातून आंतरजिल्हा प्रवसासाठी ई-पासची (e-pass) अट रद्द केली आहे. एसटीबसची सेवा देखील सुरळीत झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर जिल्ह्याला मोकळा श्वास घेतला आहे. अनलॉकच्या (unlock) संदर्भातील आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दि.6 जून रोजी काढले आहेत.
राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार आता 5 गटात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटविण्यात आली आहेत. बीड जिल्हयाचा समावेश तिसऱ्या गटात आहे. जिल्ह्यात अत्यावशक आणि इतर सर्व व्यवहार सुरु झाली आहेत. फक्त त्यासाठी सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील (essential service) व्यवसायांसह इतर सर्व व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरु ठेवता येत आहेत. अत्यावश्यक व्यवसाय रोज तर इतर व्यवसाय शनिवार, रविवार (weekend lockdown) वगळता आठवड्यातील 5 दिवस सुरु राहतील. हॉटेल 50 % क्षमतेने आठवड्यातील 5 दिवस सुरु करता येणार आहेत. दुपारी 4 नंतर हॉटेलला पार्सल सेवा देता येईल. सलून देखील दुपारी 4 वाजेपर्यंत आणि 50% क्षमतेने सुरु ठेवता येतील. ज्या ठिकाणी साईटवर मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशी बांधकामे देखील सुरु करता येतील.
क्रीडांगण, मैदाने, पार्क सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर चित्रपटगृहे आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून खाजगी वाहतुकीसाठी पासची आवश्यकता राहणार नाही.
जिल्ह्यात आठवड्यात शनिवार व रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. म्हणजेच विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) राहणार आहे. दिवसभर 5 वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
हि आहेत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना
सर्व औषधालये (Medical), दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसीचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकिय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा इ. उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत.