ऐन दसऱ्या दिवशी अंबाजोगाईत खून ; एक जखमी.

अंबाजोगाई दि.6 अॉक्टोंबर – ऐन दसऱ्या दिवशी अंबाजोगाईत खून झाल्याची घटना शहरालगत असलेल्या चनई गावात घडली. किरकोळ कारणावरुन झालेल्या हल्ल्यात एका नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याला ऐन सणादिवशी जीव गमवावा लागला असून अन्य एकावर उपचार सुरु आहेत.
( Murder in Ambajogai on the Dasara; one injured. )
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गावात रेशनवाटपावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावादातूनच आठ ते दहा जणांचा जमाव गोरखनाथ यांच्या घराच्या दिशेने चालून गेला. यावेळी शिवीगाळ करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला. यात घनघाव व मध्यस्थीसाठी आलेला एक असे दोघे जखमी झाले. दोघांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (SRTR) उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना गोरखनाथ घनघाव यांचा मृत्यू झाला.
मूळचे वाहनचालक असलेले गोरखनाथ सीताराम घनघाव (वय 50,रा. चनई ता. अंबाजोगाई) दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी नवी बुलेट दुचाकीही खरेदी केली होती. पण नियतीने मात्र त्यांचा घात केला. गावात झालेल्या किरकोळ वादानंतर त्यांच्यावर शस्त्राने सपासप वार झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऐन दसऱ्या दिवशी (दि.5 ऑक्टोबर) रोजी खुनाच्या Murder) या थरारक घटनेने चनई गाव हादरले. या घटनेनंतर अंबाजोगाई (Ambajogai) शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.