‘त्या’ वानरांसाठी येणार नागपूरचे पथक; धारुर वन विभागाची माहिती.

माजलगाव दि.18 डिसेंबर – माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील लवुळ येथे मागील दोन तीन महिन्यापासून तीन वानरांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी धारुर (Dharur) वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली व या वानरास पकडण्यासाठी नागपूरच्या (Nagpur) पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती दिली.

(Nagpur team will come for ‘those’ monkeys; Information of Dharur Forest Department.)

लवुळ या ठिकाणी मागील दोन ते तीन महिन्यापासून तीन वानरांनी धुमाकूळ घातला आहे. हे वानर गावातील श्वानांच्या पिल्लांना घेऊन जाऊन मारण्याचे प्रकार घडत होते. याबाबत गावातील नागरिकांनी धारूर येथील वनविभागाच्या (Forest department) अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. परंतु त्यांनी या घटनेला एवढे गंभीर घेतले नाही. त्यामुळे वानर लहान मुलांना देखील उचलून घेण्याचे प्रयत्न होऊ लागले.

वानरं शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पाठीमागे लागत असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल (Video Viral) झाले. यामुळे गावात दहशत पसरली आहे. याबाबत प्रसिध्दी माध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर शुक्रवारी धारूर येथील वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यानंतर वानरांना पकडण्यासाठी नागपूरच्या पथकाला पाचारण केले.

शुक्रवारी वन विभागाचे परिमंडळ अधिकारी दिनेश मोरे यांनी लवूळ ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांचे नागपूरच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क करून दिला. नागपुर येथील पथक आज शनिवारी येथे दाखल होणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!