कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन भारतातही दाखल ? आयसीएमआरचे डॉ. समीरन पांडा यांनी व्यक्त केली शक्यता.

नवी दिल्ली दि.2 डिसेंबर – सध्या संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण करणारा कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन भारतातही दाखल झाला असल्याची शक्यता असून काही दिवसांमध्ये त्याचा शोध लागेल असं आयसीएमआरचे (ICMR) साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी म्हटलं आहे.
(New corona virus Omycron introduced in India? Dr. of ICMR. Possibilities expressed by Dr. Sameeran Panda.)
9 नोव्हेंबरला ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद दक्षिण आफ्रिकेत झाली असून तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) प्रवास मोठ्या प्रमाणात झाल्याचं सांगत त्यांनी भीती व्यक्त केली आहे. काही प्रवाशांमध्ये लक्षणं असल्याची माहिती त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे.
“भारतात ओमायक्रॉन आढळल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या विषाणूची संक्रमणक्षमता पाहता काही दिवसात हे होण्याची शक्यता आहे,” असं डॉक्टर पांडा यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भारत करोनाचं संकट पुन्हा निर्माण झालं तर पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (New Variant) जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
23 देशात ओमिक्रॉन दाखल…
द.आफ्रिकेत वेगाने पसरत असलेला ओमिक्रॉन व्हेरिएंट आता तब्बल 23 देशांमध्ये दाखल झाला आहे. त्यात WHO च्या वतीने ओमिक्रॉन विषयी महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) अर्थात WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसू यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
WHO च्या क्षेत्रात येणाऱ्या 6 पैकी 5 प्रदेशातील तब्बल 23 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण नोंदवले गेले असल्याची माहिती WHO प्रमुख घेब्रेयेसू यांनी दिली आहे. 23 देशांमध्ये ओमिक्रॉनच्या रूग्णांची नोंद झाली असून ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता WHO कडून वर्तवली जात आहे. तर ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढण्याची भीती देखील WHO ने व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग बघता जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सध्या जोखीम असलेल्या देशातून 11 विमानांचं वेगवेगळ्या विमानतळावर आगमन झालं आहे. या 11 विमानांतून 3,476 प्रवासी भारतात परतले आहेत. या सर्व रूग्णांची RTPCR चाचणी करण्यात आली असून 6 प्रवासी कोरोनाबाधित (Corona Positive) आढळले आहेत. तर या रूग्णांचे नमूने जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.