शिवसेनेच्या 12 खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीत अॉनलाईन उपस्थिती ; उद्या पत्रकार परिषद.

मुंबई दि.2 जुलै – शिवसेनेच्या 12 खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीत अॉनलाईन उपस्थिती दर्शवली. हे 12 खासदार उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली. गेल्या महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर शिवसेनेतून
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केलं. यानंतर 12 खासदार संपर्कात असल्याची चर्चा होती.
एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे (Shiv Sena) तब्बल 40 आमदार (MLA) सामील झाल्यानंतर आता शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसणार आहे. आज शिंदे गटाची अॉनलाईन बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या 12 खासदारांनी (MP) अॉनलाईन उपस्थिती दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे. सदरील 12 खासदार उद्या दिल्ली येथे पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे देखील दिल्लीत ढेरे दाखल होत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, सदर घटनेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी उर्वरित खासदारांची बैठक होत आहे. शिवसेनेत सध्या नगरसेवकांपासून आमदार खासदारांपर्यंत व पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उचलबांगडी व फेरनिवडीच्या घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शिवसेनेचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असून या घडामोडीमुळे शिंदे गटाला बळ मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
कॉमेडी एक्सप्रेसचा सिझन 2
माध्यमातून सदरील प्रकार पाहिला असून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली असून हा प्रकार म्हणजे कॉमेडी एक्सप्रेसचा सिझन 2 असल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली. जनतेला व त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना भ्रमित करण्याचा हा प्रकार असल्याचेही राऊत म्हणाले.
( Online presence of 12 Shiv Sena MPs in Shinde group meeting; Press conference tomorrow. )