बापरे… बीड जिल्ह्यात आता बनावट दूध; पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई.

बीड दि.25 मार्च – काही दिवसांपुर्वी केज तालुक्यात बनावट खवा बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई नंतर आता बनावट दूध बनविणाऱ्या व्यक्तीवर एसीपी पंकज कुमावत यांच्या पथकाने कारवाई केली आहे. सदर प्रकारानंतर धक्का बसला असून रसायनापासून तयार होणाऱ्या या दूधामुळे आता जीवच धोक्यात आला आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा (Patoda) तालुक्यात रसायना पासून दूध तयार करुन तो विक्री करून जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. अशी माहिती गुप्त खबऱ्याने एएसपी (Additional Superintendent of Police) पंकज कुमावत यांना मिळाली. माहिती मिळताच कुमावत यांनी त्यांच्या पथकाला पाठवले या पथकाने नागेशवाडी येथे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास छापा मारला.
पथकाने छाप्यात दूध तयार करताना एकास रंगेहाथ पकडले. यावेळी घटनास्थळी पावडर, 160 लिटर तयार दूध असे एकूण 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अप्पासाहेब हरीभाऊ थोरवे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर कारवाई विकास चोपने, बाबासाहेब बांगर, महिला पोलिस आशा चौरे, राजु वंजारे, दराडे बालाजी तसेच अन्न भेसळ कार्यालयाचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केली.
गेल्या काही काळात एसीपी पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी कारवाईचा चांगलाच सपाटा लावला आहे. यामुळे सामान्य जनतेतून पोलीस (Police) प्रशासनाचे अभिनंदन होत आहे. यापुर्वीही पोलिसांनी बनावट खवा, बनावट मिठाई तयार करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. अशा बनावट दुध, मिठाई व खव्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
( Oops … now fake milk in Beed district; Action taken by Pankaj Kumawat’s team. )