माझं गाव

पोलिस डायरी…. धारुर शहरात तरुणाची नैराश्यातून आत्महत्या.

किल्लेधारूर दि.5 अॉगस्ट – शहरातील केज रोड भागात एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना दि.3 मंगळवारी घडली आहे. लॉकडाऊन (lockdown) काळात हाताला काम मिळत नसल्याने लागलेल्या दारुच्या व्यसनातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

(Police diary …. Young man commits suicide due to depression in Dharur city.)

धारुर (Dharur) शहरातील केज रोड भागातील वस्तीत राहणाऱ्या भुषण सुरेश माने या 32 वर्षीय तरुणाने दि.3 अॉगस्ट रोजी सांयकाळी 5 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. गेल्या दिड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना काळात हाताला काम मिळत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले.

लॉकडाऊन काळात हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यातून दारुचे व्यसन जडले. याच दारुच्या नशेत भुषण या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे पोलिस (Police) स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वखरे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!